मुंबई (Pclive7.com):- बॉलीवूडमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं मुंबईतील आपल्या स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुशांत सिंह राजपूत हा बिहारमधील पुर्णियाचा रहिवाशी होता. त्यानं मुंबईतील बांद्रा येथील आपल्या स्वतःच्या घरात गळफास घेऊन् आत्महत्या केली आहे.
सुशांत सिंह राजपूतनं ‘किस देश में है मेरा दिल’ या नावाच्या डेली सोपमध्ये काम केलं मात्र त्याला खरी ओळख दिली ती एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेनं. त्यानंतर सुशांतला चित्रपट मिळू लागले. काय पो छे मधील सुशांतच्या अभिनयाची प्रचंड प्रशंसा झाली. त्यानंतर सुशांत ‘शुध्द देसी रोमान्स’मध्ये वाणी कपूर आणि परिणीती चोपडा बरोबर अभिनय करताना दिसले होते. MS धोनीची बायोपिक M.S. धोनी : द अनटोल्ड स्टोरीमध्ये देखील सुशांतनं अभिनय केला होता. त्यानं त्या चित्रपटात प्रमुख भुमिका बजावली होती.























Join Our Whatsapp Group