पिंपरी (Pclive7.com):- भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत आज जे वक्तव्य केलेले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. गोपीचंद पडवळकर यांचे जेवढे वय असेल त्याहून अधिक वर्षे पवार साहेबांनी महाराष्ट्राला दिली आहेत. त्यामुळे गोपीचंद पडळकरांनी आपल्या कुवती प्रमाणे रहावे असा इशारा पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिला आहे.
यासंदर्भात नाना काटे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते पवार साहेब यांच्याबाबत अतिशय हिन शब्दात वक्तव्य केले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात मात्र एखाद्या व्यक्ती बद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन वक्तव्य करणे भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला शोभत नाही. ज्यांचे विधान सभेमध्ये ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले त्यांनी पवार साहेबांविषयी बोलणे योग्य नव्हे आपण थोड साभांळून बोलावे, भविष्य सांगणा-या पोपटासारखे बोलू नये. पडवळकरांची ती कुवत नाही. पवार साहेबांचे नाव सर्वच पक्षातील जेष्ठ नेतेही आदराने घेतात वेळ प्रसंगी त्यांच्याशी सल्लामसलत करतात हे पडळकरांना माहित नसावे त्यामुळे त्यांनी असे बेताल वक्तव्य पवार साहेबांच्या बाबतीत केले आहे. त्यामुळे पवार साहेबांविषयी तुमची बोलण्याची कुवत नाही. हे आपण लक्षात घ्यावे. व येथून पुढे साहेबांच्याबाबत अपशब्द काढल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपणांस योग्य उत्तर देतील हे लक्षात ठेवावे.























Join Our Whatsapp Group