पिंपरी (Pclive7.com):- निसर्ग चक्रीवादळामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या नागरिकांना कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहराच्या एक हात मदतीचा कोकणवासीयांना या संकल्पनेतून १०० कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढेे अन्नधान्य ४० कुटुंबांना २ हजार प्रती कुटुंब रोख रक्कम देऊन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे.
निसर्ग चक्रिवादळामध्ये नुकसान झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील पानवली, जांभुलनगर, बौद्धवाडी, वेरलगाव, तोंडली, वेरलगाव तसेच दापोली मधील सानेगुरूजी यांचे पालगड या गावातील नुकसान झालेल्या ग्रामस्थांना कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने १ महिनाभर पुरेल येवढे १०० कुटूंबाना अन्नधान्य किट व ४० कुटुंबांना रोख रक्कम रु २००० प्रति कूटुंब एवढी मदत सामाजिक भावनेतून कर्तव्यारूपी करण्यात आली. यासर्व मदतकार्यांत पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील सर्व कोकणवासीय,उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व संस्था यांचा सहभाग होता.




















Join Our Whatsapp Group