पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होत होता.
त्यामुळे त्यांनी घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजपर्यंत दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.























Join Our Whatsapp Group