पिंपरी (Pclive7com):- पार्थ पवारांचा लोकसभा निवडणूकीमध्ये पराभव झाला त्यामुळे पालकमंत्री अजितदादा पवार पिंपरी चिंचवड शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी वक्तव्य केले आहे. वस्तुत: नामदेव ढाके पहिल्यांदा तेही लाटेत निवडून आलेले आहेत. लाटेत निवडून आलेल्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. अजितदादांवर टिका करण्याचा बालिशपणा त्यांनी करू नये अन्यथा योग्य प्रकारे त्यांना उत्तर दिले जाईल असा इशारा विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिला आहे.
नाना काटे म्हणाले की, खरतर अजितदादांच्या जिव्हारी लागण्याचे काहीच कारण नाही. राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर अजितदादा पुणे जिल्हाचे पालकमंत्री झालेत, हेच खंरतर भाजपाच्या पदाधिका-यांच्या जिव्हारी लागले आहे. अजितदादा काम करतात की नाही हे मागील १० ते १५ वर्षांमध्ये पिंपरी चिंचवडकरांनी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे. त्यामुळे एखाद्या अडाण्या माणसाप्रमाणे पक्षातील वरीष्ठ नेत्यांना बरं वाटावे म्हणून काहीही वक्तव्ये करणे चुकीचे आहे. अजितदादांच्या विरोधात बोलण्याची कुवत तरी आपली आहे काय?
अजितदादा किती कार्यक्षम आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. अजितदादा दर शुक्रवारी पुणे येथील कॉन्सिल हॉल मध्ये पुणे जिल्हासह पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील वरीष्ठ अधिकारी यामध्ये विभागीय आयुक्त, महापालिकेचे आयुक्त, जिल्हा परीषदेचे मुख्याधिकारी, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्य़ासोबत मिटींग घेतात. त्या मिटींगमध्ये जिल्हातील सर्वपक्षीय खासदार, आमदार, महापालिकेचे पदाधिकारी जिल्हा परीषदेचे पदाधिकारी असतात. ते सर्व कामकाजा आढावा घेऊन अधिका-यांना सुचना, आदेश देतात. तसेच अजितदादा फक्त पिंपरी चिंचवडचे पालकमंत्री नसून ते उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री सुध्दा आहेत. त्यामुळे त्यांना संपूर्ण राज्याकडे लक्ष द्यावे लागते. राज्यातील प्रत्येक जिल्हांची माहिती घेत असतात प्रसंगी त्या जिल्ह्यास भेट देतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराकडे पाठ फिरवली असे म्हणणे योग्य नाही. केवळ राजकारण करायचे म्हणून असे फुसके आरोप नामदेव ढाके करीत आहेत. त्यामुळे नेत्यांची शाबसकी मिळविण्यासाठी माकडा सारख्या उड्या मारु नयेत, आपण आपल्या मर्यादेत रहावे, बालिशपणा करू नये असा इशारा नामदेव ढाके यांना नाना काटे यांनी दिला आहे.























Join Our Whatsapp Group