पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. तरी महापालिकेने कोरोनाच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी सेंटर शहरात त्वरीत सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक तथा माजी महापौर योगेश बहल यांनी केली आहे.
यासंदर्भात योगेश बहल यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या विविध राज्यामध्ये प्लाझ्मा थेरपीचा प्रामुख्याने वापर होत आहे. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीच्या प्रोजेक्ट उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हाच उपक्रम विविध राज्यामध्ये यशस्वी ठरत आहे. सदर प्लाझ्मा थेरपीचा वापर केल्यामुळे कोरोना रुग्णांची प्रकृती जलद गतीने स्थिरावत आहे. सदर प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम व जिजामाता या दोन्ही रुग्णालयामध्ये प्लाझ्मा सेंटर उभारण्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून शासनाच्या लागणाऱ्या सर्व परवानग्या त्वरित घेऊन “प्लाझ्मा सेंटर” सुरू करण्यात यावेत. अशी मागणी योगेश बहल यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group