पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्ण संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. चिंचवडमधील मोहननगर परिसरात देखील पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोहननगर वासियांनी पुढाकार घेत आज दि.०४ रोजी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला होता. येथील व्यापारी, भाजी व फळ विक्रेते तसेच समस्त मोहननगर वासियांनी १०० टक्के प्रतिसाद दिलायं.
मोहननगरमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. व पुढील काळात सुद्धा कोरोनाच्या भीषण महामारी वाढण्याची शक्यता आहे. ही महामारी आपल्या घरापर्यंत न यावी, त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी उपाय म्हणून व्यापारी, भाजीविक्रेते सर्व नागरिकांनी सर्वानी आज कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच पुढील दोन दिवस हा बंद पाळण्यात येणार आहे.
यामुळे महामारी कमी होण्यास मदत होईल. नागरिकांकडून उत्स्फूर्त जनता कर्फ्यू पाळल्याबाबत नगरसेविका मीनल यादव यांनी सर्वांचे आभार मानले आहे. तसेच पिंपरी चिंचवड वासियांनी हा उपक्रम प्रत्येक वार्डात राबवावी विनंती करण्यात येत आहे. या बंदमध्ये औषधाची दुकाने चालू ठेवण्यात आली होती.























Join Our Whatsapp Group