पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी आणि गुरुवारी या दोन दिवशी स्वयंस्फुर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
कोरोनाचा विळखा शहरात दिवसेदिवस वाढत चालला आहे. गेल्या आठवड्यापासून दिवसाला २०० ते ३०० बाधित रूग्ण आढळत आहेत. त्यापार्श्वभूमीवर शहरात कडक लॉकडाऊनची मागणी जोर धरू लागली आहे. महापौर माई ढोरे यांनी काल रविवारी आणि गुरूवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे उद्या रविवारी शहरात बंद असणार की नाही याबाबत शहरवासियांना संभ्रम होता. अखेर आज रात्री रशिरा आयुक्तांनी व्हॉटस्अप मॅसेजव्दारे रविवारी आणि गुरूवारी शहरवासियांनी स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच घराबाहेर वावरताना मास्कचा वापर करावा असे देखील आवाहन केले आहे.
आता महापालिका प्रशासनाकडून या जनता कर्फ्यूचा अधिकृत आदेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरवासीय कशाप्रकारे या आवाहनाला प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.























Join Our Whatsapp Group