पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांना सापळा रचून वाकड पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून ३८ लाखांच्या गुटख्यासह एक टेम्पो व एक इनोव्हा कार अशा एकूण ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलायं. सोमवारी (दि.१३) ताथवडे येथे ही कारवाई करण्यात आली.
जनार्दन शंभु भारती (वय २८, रा. चकाला, अंधेरी, मुंबई), सुनिलकुमार गौरीशंकर तिवारी (वय ३७, रा. गणेश गल्ली झोपडपट्टी , ठाणे वेस्ट), जियारुलखान रशीद खान समा (वय ३२, रा. शिफ्टींग चाळ, मिरा रोड, ठाणे) आणि धरमशंकर दुर्गाचरण गुप्ता (वय ३६, रा. तिलकनगर, बोरीवली-वेस्ट मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सचिन नरुटे यांना गुटख्याच्या अवैध वाहतुकीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार ताथवडे येथील हॉटेल स्टे इन समोर सापळा लावून आयशर टेम्पो (एमएच-02-ईआर-3893) व एक इनोव्हा कारची (एमएच-47के-2736) तपासणी केली असता टेम्पोमध्ये चालकसह तिघेजण मिळून आले. प्रतिबंधित गोवा गुटख्याचे २९ पोती तसेच इनोव्हामध्ये गोवा गुटख्याचे ०१ पोते असा एकूण ३८ लाख, दोन हजार ५०० रूपयांचा प्रतिबंधित गोवा गुटखा मिळून आला. पोलिसांनी टेम्पो व इनोव्हामधील मुद्देमालसह एकूण ५६ लाख २ हजार ५०० रूपयांचा ऐवज जप्त केला. अन्न व औषध प्रशासन सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, सहा. पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. विवेक मुगळीकर, वाकड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, व तपास पथकातील पोलीस कर्मचारी विजय गंभीरे, विक्रम कुदळ, सचिन नरुटे, प्रशांत गिलबिले, विक्रम जगदाळे, बापुसाहेब धुमाळ, बाबाजान इनामदार, जावेद पठाण, प्रमोद कदम, दिपक भोसले, शाम बाबा, तात्या शिंदे, नितीन गेंगजे व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी ए. एस. गवते, ए. एस. धुळे, आर. आर. काकडे यांनी मिळुन केली.























Join Our Whatsapp Group