चाकण (Pclive7.com):- अनेक दिवसांपासून चाकण पोलिसांना गुंगारा देत असलेला सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील (वय २४ वर्षे रा. नाणेकरवाडी ता. खेड जि. पुणे) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा ५० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलायं.
चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दि.१३ जुलै रोजी पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार चाकण पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने मौजे नाणेकरवाडी ता. खेड जि. पुणे येथील ठाकरवस्ती जवळील त्रिफुलीवर सापळा रचुन सराईत गुन्हेगार अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस मिळुन आले. त्याच्यावर चाकण पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला असुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपासात त्याच्या घरातुन आणखी एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत झाली. आरोपीकडुन दोन गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे असा एकुण ५० हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अक्षय उर्फ ईश्वर गोविंदा पाटील हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याचेकडुन चाकण व खेड पोलीसांनी फेब्रुवारी २०२० मध्ये सुध्दा दोन गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली होती.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त स्मिता पाटील, सहा. पोलीस आयुक्त, रामचंद्र जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस तसेच गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे, पोलीस हवालदार सुरेश हिंगे, राजु जाधव, पोलीस नाईक संजय जरे, हनुमंत कांबळे, विरसेन गायकवाड, संदिप सोनवणे, अनिल गोरड, पोलीस कॉन्टेबल निखल वर्षे, मनोज साबळे, अशोक दिवटे, नितीन गुंजाळ, प्रदिप राळे, मच्छिंद्र भांबुरे यांनी केलेली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे हे करीत आहेत.























Join Our Whatsapp Group