पिंपरी (Pclive7.com):- सांगवी परिसरात दहशत पसरवण्यासाठी राञी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने स्कुल बस, ॲम्बुलन्ससह २५ वाहनांची तोडफोड केली आहे. याबाबत नागरिकांनी पोलीसांकडे तक्रार केली आहे.
जुनी सांगवीत मध्यरात्री २ ते ३ या वेळेत अज्ञात व्यक्तींनी जवळपास २५ गाड्यांची तोडफोड करुन मोठ नुकसान केलं आहे. वाहनांच्या काचा सोडण्याची सांगवीतील ही तिसरी घटना आहे. यामध्ये कार, स्कुल बस, ॲम्बुलन्स, आदी वाहनाचा समावेश आहे. संगम नगर, छावा चौक, करण जयमाला, बुध्दघोष सोसायटी, जयमाला नगर, प्रियदर्शनी नगर या भागातील गाड्यांचे नुकसान केले आहे. याबाबत पोलीसांकडे तक्रारीही केल्या आहेत.























Join Our Whatsapp Group