पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयातील कोविड 19 कक्षाची भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आज सकाळी पाहणी केली. पीपीई किट परिधान करून कामठे यांनी या कक्षात प्रवेश केला. तेथील कोविड 19 बाधीत रुग्णांशी त्यांनी चर्चा केली. तेथील व्यवस्थापनाला रुग्णांची काळजी व देखभाल घेण्याच्या संदर्भात त्यांनी सूचना दिल्या.
‘वायसीएम’ रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खंडीत झाल्यामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला. या वृत्ताने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील कोविड 19 सेंटरमधील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी नगरसेवक कामठे यांनी आज सकाळी या कक्षात प्रवेश केला. त्यांनी पीपीई किट परिधान करून कोरोनाबाधीत रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांवर होणा-या उपचारासंदर्भात सिस्टरला सूचना देखील त्यांनी दिल्या.
ऑक्सिजन पुरवठा केंद्रातील कर्मचा-यांशी तुषार कामठे यांनी चर्चा केली. ऑक्सिजन पुरवठा चालू होता की बंद होता, याबाबत त्यांनी ठेकेदारांकडून माहिती घेतली. त्यावर ठेकेदाराने वस्तुस्थिती सांगितली. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे १० लोकांचा मृत्यू होत असेल तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याकडे लक्ष घालून सत्य परिस्थितीबाबत तत्काळ खुलासा करावा, अशी मागणी कामठे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group