पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज बुधवारी (दि.२९) दुपारी एक वाजता जाहीर झाला. पिंपरी चिंचवड शहराने दरवर्षीच्या निकालाच्या तुलनेत यावर्षी उत्तुंग भरारी घेतली. शहराचा निकाल ९८.४९ टक्के लागला.
यावर्षीच्या निकालात १२ टक्यांनी वाढ झाली आहे. मुलांचा निकाल ९८.१३ टक्के तर मुलींचा निकाल ९८.८९ टक्के लागला आहे. शहरात दहावीच्या परीक्षेला १८८ शाळामधून एकूण १८३०६ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ९६२७ मुले व ८६७९ मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातून ९४४७ मुले व ८५४३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण १८,०३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गतवर्षाच्या तुलनेत १२ टक्यांनी वाढ
गतवर्षी शहराचा निकाल ८६.४९ टक्के लागला होता. त्यामुळे या निकालात १२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले. गतवर्षी निकालात ७.८४ टक्क्यानी घट झाली होती. मुले ८२.६२ टक्के तर ९०.९४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. तर, ४५ शाळांनी निकालाची शंभरी गाठली होती.























Join Our Whatsapp Group