चाकण (Pclive7.com):- चाकण मधील मुलीवर अत्याचार करून हत्या केलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खेडचे माजी पंचायत समिती सदस्य तान्हाजी केंदळे यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
केंदळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चाकणमधील एका युवतीला विवस्त्र करुन तिची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील गुन्हेगारांना कठारे शासन झाले पाहिजे. अन्यथा लोकांचा सामाजिक न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही. लवकरात लवकर गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करून कारवाई करावी. या घटनेनंतर खेड तालुक्यातील पश्चिम भागातील ग्रामस्थ, सामान्य नागरिक, महिला वर्ग व शेतकरी बांधव भयभीत झाले आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि कलवडे कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यात यावा. तसेच या कुटुंबावर दबाव वाढत असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केंदळे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group