पिंपरी (Pclive7.com):- कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करून गणेश मंडळांना आवश्यक असणारे परवाने क्षेत्रिय कार्यालयांमार्फत उपलब्ध करून दिले जातील असे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी संगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोरोना कोविड -१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांची दि.०४ जुलै रोजी अँटो क्लस्टर येथील सभागृहात बैठक आयोजित करणेत आली होती. कोरोना कोविड – १९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीस ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आवाहन क्षेत्रिय कार्यालयांमार्फत करणेत आले होते.
ऑनलाइनद्वारे झालेल्या या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, भुमि आणि जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप तसेच आदर्श मित्र मंडळ , काळेवाडी, श्रीकृष्ण गणेश तरुण मंडळ, काळभोर नगर, मधुबन सोसायटी, सांगवी तसेच अन्य गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला होता.
अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांनी कोरोना कोविड – १९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन गृह विभागाकडील शासन परिपत्रक क्र.आरएलपी- ०६२० /प्र.क्र.९०/विशा १ ब दि.११/०७/२०२० नुसार सार्वजनिक गणेशोत्सव २०२० मार्गदर्शक सूचना नुसार योग्य ती दक्षता घेणेबाबत सार्वजनिक मंडळांना आवाहन केले.























Join Our Whatsapp Group