पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवात चाकरमानी कोकणात मोठ्या संख्येने जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणवासीयांना घरी जाण्याकरिता प्राधान्याने विशेष पास उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन दिले आहे. पिंपरी चिंचवड ही औद्योगिकनगरी आहे. नोकरी, रोजगार मिळाल्याने हजारो कोकणवासीय शहर व उपनगरांमध्ये स्थायिक झाले आहेत. या ठिकाणाहून दिवाळी, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावी जाणाऱ्या कष्टकऱ्यांची संख्या मोठी आहे.
गणेशोत्सव आणि गौराईपूजन या धार्मिक सणांचे महत्व लक्षात घेता. या सर्व गणेशभक्तांना कोकणात जाण्याकरिता विशेष पास प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची मागणी गोरखे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.






















Join Our Whatsapp Group