पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या महामारीच्या काळात रोजगार हिरावले गेले असताना, जनता प्रचंड आर्थिक तणावात आहे. मात्र केंद्र सरकारने जनतेच्या भावनांशी खेळत आश्वासनांची खैरात केली आहे. उद्योजक व नागरिकांना सुमारे २० लाख कोटी रुपयांचे गाजर पॅकेजची घोषणा केली. परंतू प्रत्यक्षात नागरिकांची फसवणूक झाली आहे. या विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे केला आहे. आज चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरी मोरवाडी येथील पिंपरी चिंचवड शहर भाजपा मध्यवर्ती कार्यलायसमोर शांत पद्धतीने मूक निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादल अध्यक्ष मकरधवज यादव, शहर युवक काँग्रेसचे विशाल कसबे, कुंदन कसबे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, तुषार पाटील उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख करोडचे पॅकेज जाहीर केले होते. अद्याप या घोषणेची अंमलबजावणी केंद्र सरकारकडून न झाल्याने शेतकरी, महिला, उद्योजक, युवक सर्वच नागरिकांना अनेक समस्यांचा समाना करावा लागत आहे. केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या वतीने राज्य भरात आंदोलन करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group