पिंपरी (Pclive7.com):- सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात मृत्यू होणा-या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. वेळेला व्हेंटिलेटर, आयसीयुबेड उपलब्ध होत नसल्याने नागरिकांच्या जिवावर बेतू लागल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर बुधवारी (दि. १९) आंदोलन करण्यात आले.
रुग्णसंख्या वाढत असताना शहरातील रुग्णांसाठी आयसीयू व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नाहीत. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. १५ ऑगस्टपर्यंत महापालिकेने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला होता. तरीही आयसीयु, व्हेटिंलेटर वाढविणे, सुरू करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यात दररोज मृत्यू होणा-या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या निषेधार्थ मनसेने आज आंदोलन केले.
मनसे शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपशहराध्यक्ष राजु सावळे, उपशहराध्यक्ष बाळा दानवले, विभागाध्यक्ष दत्ता देवतरासे, अंकुश तापकीर यांच्यासह मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.






















Join Our Whatsapp Group