पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नागरिकांना केले आहे. तसेच, यावर्षी गणपती विसर्जनाला परवानगी देण्यात आलेली नाही.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना महामारीने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. शहरातील ५० टक्के सार्वजनिक गणेश मंडळ गणपती उत्सव साजरा करणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी रक्तदान शिबिर किंवा प्लाझ्मा डोनेशन असे उपक्रम घ्यावेत असेही संदीप बिष्णोई यांनी आवाहन केले आहे.
यावर्षीची परिस्थिती गेल्या वर्षी पेक्षा खूप वेगळी आहे. कोरोनामुळे प्रशासनाने काही अटी आणि नियम लागू करून गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार गणपती बापांची मूर्ती ही ४ फुटांपर्यंतच असावी आणि शहरात संचाबंदी लागू असल्याने बाप्पाची आरती करत असताना केवळ ५ जणांना परवानगी आहे. दरम्यान, सार्वजनिक किंवा घरगुती गणपती मंडळांनी जागेवरच गणपती विसर्जन करायचे आहे. त्यामुळे विनाकारण गर्दी करून नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशा इशारा पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी दिला आहे.























Join Our Whatsapp Group