पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक बांधिलकीतून व नैतिक जबाबदारी समजून मी आज आपला ‘प्लाझ्मा दान’ केला आहे. सध्या प्लाझ्माची कोरोना रुग्णांना अत्यंत गरज दिसून येत आहे. एका प्लाझ्मा दानाने आपण दोन रूग्णांचे प्राण वाचवू शकता. एकजूटीने कोरोनाला हद्दपार करूया, मी प्लाझ्मादान करून एक छोटासा प्रयत्न जनजागृतीचा केला आहे. तुम्हीही प्लाझ्मा दान करा असे आवाहन भाजपाचे नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केले आहे.
प्रा. उत्तम केंदळे म्हणाले की, सध्या कोरोना विरुद्धच्या संघर्षात डॉक्टर आणि पोलिसांनी सामाजिक भान राखत प्लाझ्मा दान केला आहे. कोरोनामुक्त झालेल्या पोलीस, डॉक्टरांनी प्लाझ्मा दान करून कोरोना योद्धांचे सामाजिक भान दिसून आले आहे. त्याचप्रमाणे भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी सुद्धा प्लाझ्मा दान केला आहे. तसेच त्यांनी शहरातील सर्व कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आवाहन केले आहे की, आपण देखील प्लाझ्मा दान करावा. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी म्हणून मी आज माझा प्लाझ्मा दान केला आहे.
समाजात समाज सेवा करताना सामाजिक क्षेत्रात पदावर काम करणाऱ्यांनी तसेच प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श व्यक्ती, असो किंवा प्रसिद्ध व्यक्ती म्हणून मानले जाते. त्यामुळे अशा व्यक्तींनी समाजापुढे आदर्श ठेवला तरच कोरोनामुक्त झालेली प्रत्येक व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यास पुढे येईल. आणि कोरोना रुग्णांना उपचारासाठी मदत होईल. त्यामुळे लवकर आपला महाराष्ट्र तसेच देश कोरोनामुक्त होईल असा विश्वास यावेळी प्रा. उत्तम केंदळे यांनी व्यक्त केला. श्री गणरायाचे आगमन होत असताना समाजावर असणारे कोरोनाचे संकट सुद्धा गणरायाच्या कृपेने लवकरच दूर होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group