पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर भोसरी – चऱ्होली मंडलाच्या क्रीडा व सांस्कृतिक आघाडीच्या सरचिटणीस पदी सुनिल सुभाष लांडे यांची नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड उपस्थित होते.
भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, भोसरी – चऱ्होली मंडल अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र सुनिल लांडे यांना देण्यात आले आहे. सुनिल लांडे यांचे आजपर्यंतचे सेवाभावि कार्य पाहता राष्ट्रीय पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. पार्टीचे काम चांगल्या प्रकारे करून जनसेवा व भारतीय जनता पार्टीचा प्रचार, प्रसार करावा, तसेच या संधीचे सोने सुनिल लांडे करतील असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.























Join Our Whatsapp Group