पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणा-या पवनामाईचे जलपूजन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पवनानगर धरण परिसरात कोरोना संकटाचे सावट लक्षात घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने पार पडले.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे कुटुंबीय, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर तसेच पाणीपुरवठा व जलनि:स्सारण विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी, रामनाथ टकले, जलसंपदा विभागाचे उपअभियंता अशोक शेटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक व महापौर यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय दुधे, आदी उपस्थित होते.
ऑगस्ट महिन्याअखेर झालेल्या पावसाने पवना धरण १०० टक्के पूर्ण भरले असून त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. याबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी समाधान व्यक्त केले.























Join Our Whatsapp Group