पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या रावेत येथील जलउपसा केंद्रात गुरूवार (दि.०३) रोजी दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराला गुरूवारी दि.०३ रोजी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
यासंदर्भात महापालिकेने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करायची आहेत. तसेच सेक्टर क्र.२३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरूवार दि.०३ सप्टेंबर रोजी शहरातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. दि.०३ रोजी मनपा मार्फत होणारा सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.
दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा गुरूवारी बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार दि.०४ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.























Join Our Whatsapp Group