पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसेंदिवस बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आज शहराच्या विविध भागातील ९६६ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दरम्यान शहरामध्ये आजपर्यंतच्या बाधितांनी ५० हजारांचा टप्पा ओलांडला असून एकूण रूग्णसंख्या ५० हजार २९६ वर पोहोचली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरात आजअखेर ५० हजार २९६ कोरोना बाधित रूग्ण झाले आहेत. आज दिवसभरात ९६६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. आज मृत झालेले रुग्ण भोसरी (पुरुष ८१ वर्षे), पिंपळे गुरव (स्त्री ६३ वर्षे, पुरुष ७६ वर्षे), निगडी (पुरुष ५९ वर्षे), चिखली (पुरुष ४५ वर्षे), मोशी (पुरुष ३५ वर्षे), डुडूळगाव (पुरुष ६३ वर्षे), सांगवी (पुरुष ७० वर्षे), राजगुरूनगर (पुरुष ६८ वर्षे), आंबेगाव (स्त्री ५३ वर्षे), खेड (पुरुष ७५ वर्षे), रांजणगाव (पुरुष ५७ वर्षे), देहुरोड (पुरुष ७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.
आज ६३० रूग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या ३७ हजार ३८७ वर पोहचली आहे. दरम्यान आज ६ हजार ३५९ संशयित रूग्ण दाखल करण्यात आले होते. त्यातील ४ हजार ९९९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून २ हजार ९०९ रूग्णांचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत. शहरात सध्या ५ हजार ५८२ कोरोनाबाधित रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.























Join Our Whatsapp Group