पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने देहूरोड येथील घोराडेश्वर डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले.
हा वृक्षरोपणाचा उपक्रम दोन दिवस राबवण्यात आला. पहिल्या दिवशी दि.२९ ऑगस्ट रोजी ९० देशी रोपे डोंगर माथ्यावर लावण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी दि.३० ऑगस्टला सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष प्रा.श्री.श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे सर व सन एज मार्केटिंग प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक व तोरणा किल्ल्यावर नव्याने बसविण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे शिल्पकार छगनजी राठोड साहेब तसेच निसर्गराजा मित्र जिवाचे ह्या संस्थेचे सागर वाघ, राहुल घोलप ह्या सर्व मान्यवरांच्या हस्ते डोंगर पायथ्याला ११ देशी रोपे लावून संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली.
या उपक्रमात निसर्गराजा मित्र जिवाचे यांच्याकडून या मोहिमेस १०१ रोपे मिळाली. घोराडेश्वर लेक/सुपुत्र टीमचे मार्गदर्शन लाभले. या मोहिमेत चिंचवड विभागाचे दुर्गसेवकांनी व नमस्कार मावळ टीम ने खारीचा वाटा उचलला.
तसेच सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहराचे शिवा भांडेकरी, समर्थ नागठाण, लकी जोशी, तुषार ठाकरे, ऋषिकेश ठाकरे, रविराज काळे, मयूरी ताई दिवेकर, रूपालीताई खिलारे, हर्ष अगरवाल, रोहन गाडे, आकाश किरवे, प्रनव काळे, वैष्णव डाखोरे, सुहास होणे, दिपक बोराटे, रोहित जंगम, शुभम पाटील, सुरज गोजमगुंडे, निमिश सराटकर, यश ताबटकर, राहुल भोसले, प्रकाश काची, ऋषिकेश ईल्लाळेे व घोराडेश्वर लेक/सुपुत्रचे महेश पवार आदी दुर्गसेवकचे सहकार्य लाभले.























Join Our Whatsapp Group