नवी दिल्ली (Pclive7.com):- भारतात कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ३९ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशात ८३ हजार ३४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १०९६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३९ लाख ३६ हजार ७४८ इतकी झाली आहे.
सध्या देशात ८ लाख ३१ हजार १२४ अॅक्टिव्ह केसेस असून ३० लाख ३७ हजार १५२ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत ६८ हजार ४७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या रुग्णवाढीने राज्यासह देशात गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. देशात दिवसभरात ८३,८८३ तर राज्यात १८,१०५ नव्या रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रातही बाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात रुग्णवाढीबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. नागपूर आणि पुणे या दोन शहरांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. राज्यात दिवसभरात १३,९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख ४३ हजार झाली असून, २५,५८६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे.























Join Our Whatsapp Group