देहूरोड (Pclive7.com):- देहूरोड येथील शितळानगर, मामुर्डी येथे कत्तलीसाठी गोवंश जनावर आणल्याची माहिती बजरंग दल, गोरक्षक दलाने पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार तीन जिवंत बैल, सुमारे ४० हजारांचे २२० किलो मांस यासह एक टेम्पो देहूरोड पोलिसांनी रविवारी (दि.६) सकाळी जप्त केला.
याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण व सुधारणा कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. राजू नूर मोहम्मद कुरेशी (वय ४५, रा. गांधीनगर, देहूरोड) सोहेल शेरअली पिरजादे (वय २१, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) आणि बबलू (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या विरुद्ध मानद पशू कल्याण सभासद शिवशंकर स्वामी (रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.
बजरंग दलाचे कार्यकर्ते शिवांकुर खेर, प्रतीक भेगडे, मंगेश नढे, योगेश शेटे, स्वामी यांनी पोलिसांना बोलावून घेत दिलेल्या माहितीवरून, एमएच १४, एचजी ९५७६ या टेम्पोमधील २२० किलो मांस तसेच तीन जिवंत बैल जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.























Join Our Whatsapp Group