पिंपरी (Pclive7.com):- रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ने वतीने रोटरी क्लब ऑफ़ निगडीचे माजी अध्यक्ष विजय काळभोर यांच्या पुढाकाराने बाराशे पीपीई कीट, सात हजार शंभर एन 95 मास्क आणि साडे सातशे लीटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी निगडी क्लबचे माजी अध्यक्ष विजय काळभोर, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध रोटरी क्लबच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे निगडी अध्यक्ष डॉ.प्रवीण घाणेगावकर, माजी अध्यक्ष विजय काळभोर, सेवा प्रकल्प संचालक मुकुंद मुळे, साधना काळभोर, आदी उपस्थित होते.
इंटरनॅशनल रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे माजी प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या प्रयत्नातून इंटरनॅशनल रोटरी कडून मिळालेल्या २५ लाख रुपये निधीतून १२ लाखाचे साहित्य खरेदी केले. जिल्ह्यातील विविध रोटरी क्लबच्या अध्यक्षांकडे हे साहित्य सुपूर्द केले.
तसेच कोविडने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींवर अंतिम संस्कार करणाऱ्या बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून त्यांना पीपीइ किट्स, मास्क, व सॅनितायझर देण्यात आले.
रोटरी क्लब जुन्नरचे अध्यक्ष धनंजय राजूरकर, आळेफाटा क्लबचे अध्यक्ष विराज जाधव, नारायणगाव क्लबचे अध्यक्ष स्वप्नील घोडेकर, नारायणराव हायवे क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब गिलबिले, राजगुरूनगरचे अध्यक्ष राहुल वाळुंज, चाकण क्लबचे अध्यक्ष सुहास गोरे, चाकण एअरपोर्ट क्लबचे अध्यक्ष सुनील कड, वाल्हेकरवाडी क्लबचे अध्यक्ष सचिन काळभोर, प्रदीप वाल्हेकर, तळेगाव एमआयडीसी क्लबचे संतोष खांडगे, लोणावळा क्लबचे अध्यक्ष उदय पाटील यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले.
हे सर्व साहित्य १२ क्लबच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील मावळ, राजगुरूनगर, आंबेगाव, जुन्नर, या तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहर परिसरातील कोविड केअर सेंटर मधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.























Join Our Whatsapp Group