पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दापोडी येथून चक्क नगरसेवकाची दुचाकीच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून चोरून नेण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे. नगरसेवक राजू बनसोडे यांनी यासंदर्भात भोसरी पोलीसांत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक राजू बनसोडे यांनी त्यांची १५ हजार रुपये किंमतीची मोपेड दुचाकी (एमएच १४ ईजे ९३६६) पुणे-मुंबई महामार्गावर सीएमई गेटसमोर असलेल्या जनसंपर्क कार्यालयासमोर ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता पार्क केली होती.
अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक उघडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आला. याबाबत ९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.























Join Our Whatsapp Group