पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांच्या सौजन्याने वाकड मधील रहिवाश्यांची मोफत कोविड १९ तपासणी करण्यात येणार आहे. राम वाकडकर जनसंपर्क कार्यालय वाकड – डांगेचौक रोड, ओरियन हॉस्पिटलच्या समोर, वाकडकर फार्म वाकड या ठिकाणी १२ व १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत हि तपासणी असणार आहे, सर्व नागरिकांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन राम वाकडकर यांनी केले आहे.
कोरोना गंभीर विषाणु देशभरात पसरला असल्याने सुरूवातीला पहिल्यांदा सबंध देश लॉकडाऊन झालेला. त्यावेळी श्री उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, राम वाकडकर यांच्या सौजन्याने कोरोना विषाणुमुळे खबरदारी घेतली जावी म्हणून निर्जंतुकीकरण करण्याचे यंत्र प्रथम वाकड पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बसविण्यात आले. व परिसरातील काही सोसायटीत पण ते यंत्र बसविण्यात आले.
त्याच वेळी वाकड व परिसरातील गरीब, व गरजू असलेल्या ५००० कुटुंबियांना किमान दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप वाकड पोलिस ठाण्यातील अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच वाकड परिसरात लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी अन्नछत्रच्या माध्यमातून हजारो गरजू नागरिकांना दोन्ही वेळेस जेवण देण्यात आले. सुरूवातीला तीन महिने सगळे कामकाज पुर्णपणे बंद असताना श्री उद्योग समूहातील संपूर्ण कर्मचारी वर्गाला मासिक वेतन देण्यात आले. हे सगळं होत असताना, परिचयातील कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला त्यांना लवकरात लवकर आवश्यक ते उपचार कसे करता येतील यासाठी प्रयत्न करणे, कोणाला रेमडिसिवर सारख्या महागड्या इंजेक्शनची गरज भासली तर ते ताबडतोब उपलब्ध करून देणे. तसेच प्रसंगी आर्थिक मदत देखील त्यांनी केली. परंतु कुठेही मोठेपणा घेतला नाही. कारण जे जे आपल्या सोबत आहेत ते सगळे आपलेच आहेत अशी भावना राम वाकडकर यांच्या मनात होती.
आता अनलॉक सुरू झाले आहे. लोकांचे उद्योग व्यावसाय सुरू झालेत. त्यामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क ही वाढतच आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नाही. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त तपासणी व्हायला हवी जेणेकरून लवकरात लवकर कोरोनाला रोखण्यात आपल्या सर्वांना यश मिळेल. या उद्देशाने राम वाकडकर यांच्या सौजन्याने वाकड व परिसरातील सर्वसामान्य जनतेची कोरोनाची मोफत तपासणी केली जाणार आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांनी आपली तपासणी करून कोरोनाला रोखण्यासाठी पुढे यावे असे आवाहन देखील वाकडकर यांनी केले आहे.























Join Our Whatsapp Group