पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इमारतीतील टेरेसवर असलेल्या भंगार साहित्याला आग लागली. ही घटना आज सकाळी जुनी सांगवी येथे घडली. आगीचे कारण समजू शकले नाही.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जुनी सांगवी येथील श्री गजानन महाराज मंदिरासमोर कार्यालय आहे. या इमारतीच्या टेरेसवर विद्युत विभागाने केबल तसेच इतर साहित्य ठेवले आहे. शनिवारी सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास टेरेसवरील भंगार साहित्याने पेट घेतल्याची माहिती महापालिकेचे सुरक्षा रक्षक दिलीप बाविस्कर यांनी रहाटणी येथील अग्निशामक उपकेंद्रास दिली.
घटनेची माहिती मिळताच रहाटणी उपकेंद्रातील अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अर्ध्या तासात त्यांनी येथील आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.























Join Our Whatsapp Group