पिंपरी (Pclive7.com):- आजारपणाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.११) रात्री भोसरी येथे उघडकीस आली.
भरतलाल रामदास यादव (वय ५५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील हवालदार बबन मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतलाल यादव यांनी राहत्या घरात वायरच्या साह्याने छताच्या हुकाला गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
नातेवाईकांनी भरतलाल यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भरतलाल यांच्यावर दोन वर्षापूर्वी ह्रदयासंबंधी शस्त्रक्रिया झाली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.























Join Our Whatsapp Group