पिंपरी (Pclive7.cm):- भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेच्यावतीने आज सोमवारी १४ सप्टेंबर रोजी ११.३० वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
पिंपरी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये भीमा कोरेगाव दंगलीमध्ये संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचा उल्लेख आले होते. सदर फिर्यादीनुसार त्यांना आरोपी देखील करण्यात आले असून तीन वर्षानंतर सुद्धा अद्याप पर्यंत संभाजी भिडे यांची चौकशी देखील पोलिसांकडून झाली नसल्याने त्याचा निषेध करण्यात येणार आहे.
सदर प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करावी तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष उपाययोजना करावी या मागणीसाठी सदर सत्याग्रह आंदोलन येणार आहे.
या आंदोलनात रिपब्लिकन युवा मोर्चा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समाजवादी पक्ष, कष्टकरी कामगार पंचायत, एम आय एम या प्रमुख पक्षांसह इतर अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.




















Join Our Whatsapp Group