पिंपरी (Pclive7.cm):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. चिंचवड विधानसभेतील शेकडो युवकांनी राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नुकताच जाहिर प्रवेश केला.
पिंपरी चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांच्या निगडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेश करण्यात आला.
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शेकडो युवकांनी मनसेमध्ये प्रवेश केला. ताथवडे, वाकड, चिंचवड या परिसरातील सक्रीय हे तरुण आहेत.
यावेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपाध्यक्ष चंद्रकांत बाळा दानवले, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, विभाग अध्यक्ष मयुर चिंचवडे, रवि जाधव उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अध्यक्षपदी सिधेश सोनकवडे यांची तर रोहण पालांडे व चेतन सुनील लिम्हण यांची प्रभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group