पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका राबवित असलेल्या पंतप्रधान आवास योजनेत सन २०१७ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या व अर्ज सादर केलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव व विशाल यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत यादव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेसाठी २०१७ साली सर्वेक्षण केले होते. तसेच अर्जही मागविले होते. यानंतर आता पुन्हा नव्याने पाच हजारांच्या डीडीसह अर्ज मागविले आहेत. यापूर्वी अर्ज केलेले व पात्र ठरलेले लाभार्थी गेल्या तीन वर्षांपासून घरांच्या प्रतिक्षेत आहेत.
घरांच्या वाटपासाठी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत काढत असताना तीन वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांचा प्राधान्याने विचार करावा. विविध प्रक्रल्प आणि रस्ते यासाठी बाधित होऊन बेघर झालेल्या नागरिकांनाही या योजनेत हक्काचे घर मिळवून द्यावे तसेच महापालिकेच्या वेगवेगळ्या आरक्षणासाठी ज्यांना आपले घर गमवावे लागले त्यांच्यासाठीही स्वतंत्र कोटा तयार करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group