पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध कामांना शासनाची मान्यता मिळाली. हा प्रस्ताव रद्द करणे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी रयत विद्यार्थी परिषदेच्या वतीने पिंपरीत मुकनिदर्शने करण्यात आली.
रयत विद्यार्थी परिषदेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ही निदर्शने करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अत्यावशक सेवा डावलून विकास कामाच्या नावा खाली कोट्यावधीची निविदा मंजूर केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महाराष्ट्र राज्य शासनाकडे १६८२ कोटी ६६ लाख ८८ हजार ६१३ रुपयांच्या निवेदांच्या प्रस्तावास राज्यशासनाने काही शुल्लक अटींच्या अधीन राहून नगरविकास विभागाने तात्काळ सहमती दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच महापालिकेने शहराची केलेली बनवाबनवी थांबवावी, अशी मागणी रयतच्या वतीने करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत झालेल्या आंदोलनात परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे, सचिव रविराज काळे, खजिनदार ऋषीकेश कानवटे, सहसचिव ओमकार भोईर, सहखजिनदार हर्षद बनसोडे, सदस्य अजय चव्हाण, सुरज जमदाडे, संकेत भिगणकर आदी सहभागी झाले होते.