पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथील जलउपसा केंद्रातील उच्चदाब वीज संच मांडणीचे अचानक तातडीचे उद्भवले आहे. त्यासाठी आज (मंगळवार दि.०६) सकाळी ११ ते १२.३० या कालावधी जलउपसा बंद राहणार आहे. त्यामुळे दुपारी १२ नंतरचा, सायंकाळचा, रात्रीचा तसेच दूस-या दिवशी उद्या (बुधवारी दि.०७) सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहणार आहे.
पिंपरी चिंचवडकरांना मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पालिका रावेत बंधा-यातून पाणी उचलते. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन शहराला पाणीपुरवठा केला जातो.
जलउपसा केंद्र रावेत येथील पंपगृहांमधील २२ के.व्ही. उच्चदाब वीज संच मांडणीचे अचानक उद्भवलेले उपस्कर वाहिनीचे तातडीचे दुरूस्ती काम करण्यात येणार आहे. त्यासाठी आज मंगळवारी सकाळी ११ ते १२.३० या कालावधी मध्ये जल उपसा बंद राहणार आहे.
त्यामुळे आज दुपारी १२ नंतरचा, सायंकाळचा व रात्रीचा तसेच दूस-या दिवशी उद्या बुधवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होणार आहे.
नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा व जल निःसारण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group