पुणे (Pclive7.com):- खेडचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेव गोरे (वय 55) यांचा आज (10 ऑक्टोबर) कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात गेली 25 दिवासांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ, आई असा परिवार आहे.
गोरे यांनी चाकण जिल्हा परिषद गटाचे सदस्य, तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. गोरे हे 2014 ते 2019 या दरम्यान ते खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार होते. शांत, संयमी, मितभाषी असे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना 2009 मध्ये खेडची उमेदवारी दिली होती. मात्र, काही कारणामुळे ती रद्द केल्याने 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते आमदार झाले होते.






















Join Our Whatsapp Group