पिंपरी (Pclive7.com):- भाजपाच्या नगरसेविका निर्मला कुटे यांनी वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रहाटणी-पिंपळे सौदागर प्रभागातील आरोग्य कर्मचार्यांना वाफेचे मशिन (स्टिमर)चे वाटप केेले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सफाई तसेच आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा करत आहेत. अशा परिस्थितीत त्या कर्मचार्यांचे आरोग्य सुरक्षित रहावे याकरीता आणि प्रभागातिल महिला बचत गटांना व २५० महिला कामगारांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका निर्मलाताई कुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने स्टिमर मशिनचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, कामगार नेते बबनराव झिंजुर्डे, जयनाथ काटे, शेखर कुटे, संजय कुटे, स्वीकृत-नगरसदस्य संदीप नखाते, भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस कुंदाताई भिसे, कपिल कुंजीर, अरूण चाबुकस्वार, देवा नखाते, राकेश भास्कर, संकेत कुटे, पीसी लाईव्ह न्यूजचे संपादक संदेश पुजारी, पत्रकार शिवप्रसाद डांगे, आरोग्य विभागाचे अधिकारी सौदाई, विजय धनवटे, ह.भ.प संपत मेटे, सुनील वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.



















Join Our Whatsapp Group