पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आज दोन वासरे जखमी अवस्थेत आढळून आलीत. त्यांना उपचारासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात नेले असता सुविधा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर सकाळी बेमुदत आंदोलन सुरू केले होते.
पिंपरी चिंचवड शहरात आज वाहनाच्या धडकेत तसेच कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन वासरे गंभीर जखमी झाले होते. त्या वासरांवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर महापालिकेच्या पशुवैद्यकीय रूग्णालयात नेले असता कुठलीही सुविधा उपलब्ध झाली नाही.
श्रींमत महापालिका असा नावलौकीक असताना गाई, वासरांना २४ तास उपचार सेवा उपलब्ध होत नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर सकाळी बेमुदत आंदोलन केले. जोपर्यंत या वासरांना संपूर्ण वैद्यकीय सुविधा व व्यवस्था उपलब्ध होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती.






















Join Our Whatsapp Group