पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास ४ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. काही वेळापूर्वी ही कारवाई झाली आहे. दिघी पोलीस ठाण्यात असणाऱ्या सहाय्यक उपनिरीक्षकाला पकडण्यात आले आहे. यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती सदाशिव चव्हाण (वय ५६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्ती सदाशिव चव्हाण हे दिघी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चव्हाण यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यावेळी तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज निवृत्ती चव्हाण यांना तडजोडीअंती ४ हजार रुपयांची लाच घेताना सापळा कारवाईत पकडण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group