पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी सेलचे दिवंगत अध्यक्ष स्व.प्रदीप गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. अनाथ आश्रम मध्ये धान्य वाटप करण्यात आले.
जागतिक अंध अपंग दिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी त्यांची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम अंध अपंग विकास असोसिएशन या संस्थेत करण्यात आला. वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, रशीद शेख, महेश जपके, गंगा धेंडे, अलोक गायकवाड, प्रणव गायकवाड, नानासाहेब निकाळजे, स्मिता गायकवाड, रुपाली खरात उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group