पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पक्ष चिंचवड विधानसभा महिला मोर्चा आणि उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने सांगवी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.
भाजपच्या चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या, कोरोना महामारीच्या काळात जसे डॉक्टर, सफाई कर्मचारी कार्यरत होते त्या पद्धतीने पोलिस प्रशासन सुद्धा जनतेच्या रक्षणासाठी, सुरक्षेसाठी अहोरात्र सतत कार्यरत होते. कोरोना काळात पोलिस प्रशासनाची जनतेसाठी खुप मोठी मदत झाली. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.
यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुल पाटील, शैलेष बासुतकर, विकास काटे, शाम कुंजीर, महेश गवस, विवेक भिसे, ऋषिकेश होणे, अनिकेत फुरंगे, अॅड. मुक्ता खानदेशी, सोनाली शिंपी आदी उपस्थित होते.
सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रंगनाथ उंडे, उपनिरीक्षक अजय भोसले यांनी कुंदा भिसे व संजय भिसे यांचे आभार मानले.






















Join Our Whatsapp Group