पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभागातर्फे २०० गरजु महिला व मुलींना सहा महिन्यांचे सॅनिटरी नॅपकीन करण्यात आले. रविवारी दि.२५ रोजी हा कार्यक्रम पार पडला.
पिंपरी चिंचवड शहराच्या युवती विभागाच्या सोशल मीडिया संयोजिका पुजा आल्हाट, युवा मोर्चा चिटणीस मुक्ता गोसावी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवती प्रदेश सह संयोजिका वैशाली खाड्ये, अलका वाघुले, विजया आल्हाट, सुजाता बोराटे, सुरेखा बनकर, सिंधू आल्हाट या उपस्थित होत्या.
भारतीय जनता युवा मोर्चातील युवतींनी दुर्गा महोत्सवाचे औचित्य साधून आर्थिकदृष्ट्या सक्षम नसनाऱ्या २०० महिलांना सहा महिने पुरेल एवढे सॅनिटरी नॅपकीन देण्यात आले.






















Join Our Whatsapp Group