पिंपरी (Pclive7.com):- पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणुक आज होत आहे. पदवीधरसाठी पहिल्या दोन तासात सकाळी १० वाजेपर्यंत ८.५२ टक्के एवढे मतदान झाले आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी सकाळी १० वाजेपर्यंत ११.३८ टक्के मतदान झाले आहे.
● पुणे पदवीधर मतदारसंघात ४ लाख २६ हजार २५७ मतदार आहेत. त्यापैकी सकाळी १० वाजेपर्यंत ३६ हजार ३१३ मतदारांनी (८.५२ टक्के) मतदान केले आहे.
एकूण झालेले मतदान
पुणे जिल्हा – ९५६३ : ७ टक्के
सातारा जिल्हा – ४२५८ : ७.२१ टक्के
सांगली जिल्हा – ७८३३ : ८.९८ टक्के
सोलापूर जिल्हा – ४१३८ : ७.६९ टक्के
कोल्हापूर जिल्हा – १०५२१ : ११.७५ टक्के
(कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सध्यातरी सर्वाधिक आहे.)
● पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण ७२ हजार ५४५ मतदार आहेत. त्यापैकी सकाळी १० वाजेपर्यंत ८ हजार २५२ मतदारांनी (११.३८ टक्के) मतदान केले आहे.
एकूण झालेले मतदान
पुणे जिल्हा – २६०८ : ८.१० टक्के
सातारा जिल्हा – ८२१ : १०.६५ टक्के
सांगली जिल्हा – ९१९ : १३.४९ टक्के
सोलापूर जिल्हा – १६७५ : १२.३३ टक्के
कोल्हापूर जिल्हा – २२२९ : १८.२२ टक्के
(कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी सध्यातरी सर्वाधिक आहे.)