पिंपरी (Pclive7.com):- ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं आज निधन झालंय. रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर कला रंग संस्थेचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी शोक व्यक्त करत भावनिक प्रतिक्रिया दिलीये.
अमित गोरखे म्हणाले, ‘रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने ‘भारदस्तपणा’ मिळवून देणाऱ्या जेष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. वयावर मात करून जिद्दीने रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज आपल्यातून गेला.’
‘दूरदर्शनवरील वस्ताद पाटील असो नाहीतर महाभारतातील धृतराष्ट्र, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांत अक्षरशः प्राण ओतला. असा चतुरस्त्र कलाकार आज आपल्यातून गेल्याने मोठी हानी झाली,’ असल्याचंही ते म्हणालेत.
पटवर्धन यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालंय. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जातेय.






















Join Our Whatsapp Group