पिंपरी (Pclive7.com):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ हजार अभिवादन पोस्टकार्ड चैत्यभूमीच्या पत्त्यावर पाठवले गेले आहेत. देशात कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेच्या परिस्थितीचे भान लक्षात ठेऊन विशेष खबरदारी घेऊन हा उपक्रम राबविला जात आहे.
६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशाभरातून लाखो नागरिक दादर येथील चैत्यभूमी याठिकाणी जमत असतात. पण सध्याचे कोरोनाचे भान ठेऊन गर्दी टाळण्यासाठी पोस्टकार्डद्वारे अभिवादन हा उपक्रम लढा यूथ मूव्हमेंट व धम्मक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ५ हजार अभिवादन पत्रे चैत्यभूमी दादर, मुंबई या पत्त्यावर पाठवून राबवला आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी दिली.
धम्मप्रकाश क्षिरसागर, भैय्यासाहेब ठोकळ, अमित गोरे, पंकज धेंडे, समाधान कांबळे, आप्पा कांबळे, बुद्धभूषण अहिरे, सिद्धार्थ मोरे, संदीप माने, राकेश माने, गौतम कांबळे, यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.






















Join Our Whatsapp Group