पिंपरी (Pclive7.com):- आपल्या राज्यात आलेल्या नागरिकाला इतर नागरीकांनी एक सुवर्णमुद्रा व घर बांधण्यासाठी एक विट देवून मदत करण्याची परंपरा अग्रसेन महाराजांनी सुरू केली होती. या परंपरेनुसार आगरवाल समाज समाजिक कार्य करण्यात अग्रेसर राहून समाज समृद्धीसाठी झटत असतात. असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काढले.
चिंचवड येथील आगरवाल समाज चिंचवड-प्राधिकरण आणि नेशन हेल्प संघ संचलित श्री अग्रसेन अन्नपूर्णा रसोई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाअन्नदानाच्या (अन्नकुट) कार्यक्रमात ते बोलत होते.
या अन्नदानाचा सुमारे चौदाशे आगरवाल बांधवांनी लाभ घेतला.यावेळी काही भाविकांनी कोरोना काळात सामाजिक अंतर ठेवून बुफे जेवणाचा आस्वाद घेतला तर इतर भाविकांसाठी भोजन पार्सलची सोय केली होती. आगरवाल समाजातील गरजू विद्यार्थ्यांना ५५ हजाराची शैक्षणिक मदत यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमास आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अग्रसेन रसोई व नेशन हेल्प संघाचे अध्यक्ष सुनील जयकुमार आगरवाल, रमेश गोयल,मुकेश मित्तल, गोपाल आगरवाल, नवीन बंसल,आशिष आगरवाल, सुजीत गर्ग,सुशील मित्तल, विनोद मित्तल, विजय आगरवाल, विनोद बंसल आदी उपस्थित होते.
आयुक्त कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले कि, समुद्राला जलधारा देणे आणि सुर्याला दिवा दाखवणे अयोग्य, धनवान व्यक्तीला धन देणे व भूक नसलेल्याला जेवण देणे व्यर्थ आहे. समाजातील जे रंजल्या गांजल्यांना मदत करणे हि समाजसेवा आहे. आगरवाल समाजाने कोरोना काळात अन्नदान करून हे पुण्याचे कार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर आगरवाल यांनी तर आभार सुनील जयकुमार आगरवाल यांनी मानले.
यावेळी सुनील ज. आगरवाल म्हणाले कि,कोरोना काळात मि आणि रमेश गोयल,सुजीत गर्ग,आशिष आगरवाल,मुकेश मित्तल व संदीप गुप्ता आम्ही सहा जणांनी मदत करण्याचा संकल्प करीत २३ ते २६ मार्च या दरम्यान चिंचवड महामार्गावर उभे राहून नाष्टा,फळे,पाणी बाटलीचे वाटपास सुरुवात केली. नंतर जेवण बनवून ट्रान्सपोर्ट नगरमध्ये सकाळी ३०० व संध्याकाळी ३०० ड्रायव्हर व क्लिनर ला अन्नसेवा देवून या कार्यास सुरुवात केली.इतर ठिकाणची वाढती लक्षात घेवून एका वेळेस सुमारे ८ हजार नागरीकांना जेवण देण्यास प्रारंभ झाला. प्रेमचंद मित्तल व विनोद बंसल यांच्या मार्गदर्शना खाली अन्नदानाचा यज्ञ सुरू ठेवला.
या कार्यात अमन आगरवाल,कमल बंसल,निर्माण ग्रूपचे संचालक सुनील रा. आगरवाल,एबीसी ग्रूपचे प्रमुख राकेश चंद्रभान,नवीन बंसल,गोपाल आगरवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच रमेश गोयल,मुकेश मित्तल,गोपाल आगरवाल,नवीन बंसल,सुशील मित्तल,आशिष आगरवाल,सुजीत गर्ग,जोगिंदर मित्तल,ओमकार पारेख,अशोक तायल,सचिन नावंदर,अनिल पटेल, पवन गोयल,विजय आगरवाल,विनोद मित्तल,संदीप गुप्ता,सत्पाल मित्तल,निरंजन आगरवाल,लजपत मित्तल,नितीन आगरवाल यांनी स्वयंसेवक म्हणून विशेष परिश्रम घेतले. तसेच नेशन हेल्पच्या माध्यमातून अग्रसेन कोविड केअर सेंटर उभारून रुग्णसेवा केली.