पिंपरी (Pclive7.com):- आज दि. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भारतीय लहुजी पँथर व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्यास मातंग समाजाचे जेष्ठ नेते संदिपानजी झोंबाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय लहुजी पँथर प्रदेश संघटक युवराज दाखले, मातंग समाजाचे जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे, आक्षय दुनघव, आविनाश सोनपाखरे, आक्षय खरात, भारतीय लहुजी पँथर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल झोंबाडे, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष शंकर झोंबाडे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



















Join Our Whatsapp Group