पिंपरी (Pclive7.com):- लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली वीजबिले पूर्णता माफ करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पिंपळे गुरव येथे धरणे आंदोलन करण्यात आले. मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांच्या नेतृत्वात आज दि.१० डिसेेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास हे आंदोलन सुरू करण्यात आले होते.
कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योगधंदे, व्यवसाय बंद होते. सर्ववसामान्य मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. राज्य सरकारने मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र तरी देखील मोठ्या रक्कमेची वीजबीले नागरिकांना देण्यात आली होती. मात्र मनसेच्या वतीने ही वीजबीले पूर्णपणे माफ करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. हप्त्याने नाही आणि महिन्यानी नाही. लाँकडाऊन काळातील वीजबिल भरायला आम्हाला जमणार नाही अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या.
नागरिकांनी वीजबिलाची झेरॉक्स मनसेकडे प्राप्त केल्या होत्या. यावेळी या विजबिलाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारणाही करण्यात आली. जमा झालेल्या वीजबिलाची त्याठिकाणी होळी करण्यात आली. कोरोना महामारी नियमांचे पालन करत काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहर उपाध्यक्ष राजू सावळे, उपविभाग अध्यक्ष अनिल भुजबळ, प्रभाग अध्यक्ष प्रदिप गायकवाड, उपविभाग अध्यक्ष सुरेश सकट, वार्ड अध्यक्ष प्रकाश हादवे, शाखा उपाध्यक्ष गोविंद वाल्हेकर, मनसे सदस्य विजय खंदारे, राहुल खंदारे आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group